चाहे तुम कुछ ना
कहो.. मैने सुन लियाsssssss.. । तिने सहज मयुरकडे पाहिलं तो तिच्याकडेच बघत होता..
तिने डोळ्यांनीच, भुवया उंच करुन “काय.??” असं विचारलं “किती हळु गातेस
अगं.. अजुन जोरात गा की.. नाहि म्हणजे लोकांनाही थोडा त्रास होउ दे.. मीच एकटा का
सहन करु” तिने डोळे लहान करत, डोळ्यात शक्य
तेवढा राग भरत त्याला नजरेनेच डाफरलं. कानात कोंबलेला headset बाजुला केला. आणि कामात डोकं खुपसलं.
“श्या.. रोज तेच तेच काम काय करायचं..कधी काही नविन काम येत
नाहि” कंप्युटर जवळचा माउस जोरात हलवत तीने स्वत:शीच म्हंट्ल. तसं
काम काहि अगदिच वाईट देखिल नव्ह्तं, पण आवडीचंही नव्हतं. आता ओफ़िसमध्ये बसुन नुस्त्या testcases लिहिणे.. त्या execute करणे.. defects टाकणे.. अणि retest करुन close करणे या व्यतिरिक्त कामात काहिच बदल होत नव्ह्ते.
“एक बाळ टेस्टर जेव्हा IT च्या समुद्रात हात-पाय मारयला शिकतो तेव्हा तो ह्याच
गोष्टी तर करतो, मग मागच्या २-२.५ वर्षात काहीतरी फ़रक पडायला हवा होता.
अगदिच back strokes नाहीत निदान टायर शिवाय तरी पोहोता यायला पाहिजे ना..!!, ए निशी.. ऐकतेस का?”
“तुला चहा हवाय कां?” निशी ने विचारलं
“उम्म्म्म.. हो बहुतेक..!! ” तिने मान डोलावली
निशी तिच्या तशी
जवळची होती, तिला समजुन घेत होती.. दोघींची आवड-निवड हि बर्यापैकी एकच
होती... दोघि जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या.. एकाच वेळी कंपनीत आल्यापासुन
दोघी सतत एकत्र असतं, प्रोजेक्ट पण एकच.. सतत एकमेकांच्या पाठीशी असल्यामुळे
त्यांची मैत्री घट्ट झाली होती.
चहावाल्याकड्ची
उधारि clear करुन , दोन कप चहा हातात घेउन दोघी थेट गच्चीवर गेल्या. चहाच्या प्रत्येक घोटांबरोबर
त्यांच्या गप्पा रंगत होत्या, “आपला Lead काहि कामाचा नाहि
गं, आपण हमालीकाम करायची अणि हा बसुन क्रेडिट खाणार” पासुन ते “ह्या वेळी सगळ्यांना फक्त ५% increment मिळणार म्हणे, कंपनी डुबायला लागलीये बहुतेक.. कांद्यांचे भाव बघ, त्यांना ही भाव मिळतो यार..नाहितर आपण..!!” इथपर्यन्तच्या चर्चांना उधाण फ़ुटलं होतं
”“श्री गेला अगं प्रोजेक्ट सोडुन.. काय उरलं आता इथे” निशी रड्क्या सुरात म्हणाली.
“जाउ दे गं, तु कुठ बोलली होतीस का त्याला थांब म्हणुन, त्याला कसं कळेल, थांबायचं का जायचं ते” तिने समजुत कढायचा प्रयत्न केला.
“तुला काय त्याचं, तु कधी प्रेमं केलसं कोणावर? ” चेहेर्यावर खोटा राग आणत निशी म्हणाली
“कधी केलं नाही अणि कधी होउ पण नये, कोण पड्णार ह्यात.. नस्ते उद्योग” एक मोठा आवंढा गिळत तिने आपली बाजु मांड्ली.
“बरं ते जाउदे.. guess what,
मला आज एका नविन Blog ची लिंक मिळाली तुला देइन वाचायला”
“अणि आत्ता सांगतियेस तु हे मला??” ती जवळ्पास ओढतचं निशीला परत खाली घेउन आली,
चांगले Blog वाचणे हा तिचा आवडता छंद होता. ती वाचता वाचता कल्पनेच्या दुनियेत हरवुन जात
असे.. डोळ्यांसमोर चित्र उभं करतं ती त्या कथेतल्या पात्रांना सजीव करि. अणि त्या
कथेचाच एक भाग बनुन जाई. मग तिला कशाचं भान नसे.. Travel Blog वाचताना तिथे खळाळणा-या नदिचा नाद तिला
ऐकु यायचा, Trek Blog वाचताना
सह्याद्रिचे कातळ कडे तिला साद घालायचे. Love
Stories वाचताना नकळत तिच्या चेहेर्यावर हसु उमटायचं, Suspense-Thriller Stories मध्ये त्या Detective
Agent पेक्षाहि रहस्य
शोधण्याची तिला जास्त घाई असे. फ़क्त जेवण बनावण्याचे Blogs मात्र तिने कधी वाचले नसावेत, कारण जेवण हे खाण्यापुरतं मर्यादित असावं तिच्यासाठी.
दुसर्या दिवशी
सकाळी लवकरचं ती ओफ़िसला आली पर्स बाजुला ठेवली आणि कंप्युटर चालु केला. “आज हे काम पुर्ण झालंच पाहिजे..” असं म्हणुन मेल्स चेक करण्यासाठी तिने मेलबोक्स ओपन केला.
“***जोश २०११- आपल्यातल्या सुप्त कलागुणांना वाव द्या....
ग्लोबल-लॉगिक समवेत घ्या गरुड भरारी..!!!*** ” अशा आशयाचं मेल बघुन तिला थोड हसु आलं, “हे काय करायला लागलीये आपली कंपनी” तीने पुढे वाचायला सुरुवात केली. ओडिशन्सची मेल होती, आय.टी कंपन्यां
अंतर्गत होण्यार्या स्पर्धांमध्ये पाठ्वण्याकरिता ग्लोबल-लॉगिक आपलं स्व:ताचं एक
पथक तयार करत होतं, त्यासाठी त्यांना आभिनय-नाट्य, संगीत, वादन, गायन, न्रुत्य, अश्या वेगवेगळ्या स्तरांवर फ़क्त बेस्ट लोकं निवडायची होती, जास्त खोलात न जाता तिने मेलबोक्स बंद केला. अणि कामं करायला
सुरुवात केली.
दुपारी
नेहेमीप्रमाणे मोकळ्यावेळात निशी तिच्या डेस्कवर आली,
“काय गं मेल वाचलास का? घ्यायची का मग
गरुड्झेप??” ..निशी
“हो वाचला ना.. कसली गरुड्झेप घेतेस अगं.. तो कावळा काय जाउ
देणार आहे का?.. प्रोजेक्ट डिलिवरी डेट जवळ आलीये.. कामं खुप वाढलीयेत आता..
स्ट्रेच युवरसेल्फ़ असं सारखं म्हणतो तो.. एवढं स्ट्रेच करुन माझी उंची निदान २ इंच
तरी वाढली असेल.. हे हे हे..” ..ती
हसु का? अगं खरचं म्हणतीये मी, तु कित्ति छान डान्स करतेस, तुझ्या घरी कितीतरी पारितोषिकं आहेत, give it a try at least, don’t give up like this…… जाउन यायला काय हरकत आहे? .. निशी
“सगळं खरं आहे गं, पण आपल्या प्रोजेक्टमध्ये यायची वेळ नक्की आहे.. जायची नाही. आणि
शनिवार-रविवार सारख्या हक्काच्या सुट्या तर कधी-कधी मागुन देखिल मिळतं नाहि.. कसं
जमणारं?
“अगं नाचतेस कुठे.. त्यापेक्षा गा ना.. लोकांना कळु दे तुझी
गायनकला.. एरवी headset कानात घालुन
डासासारखी गुणगुणतेसच ना” इति मयुर
“तु गपतोस का मार खातोस?” तिने तिच्या सभ्य भाषेत विचारलं
“य़े लो.. भलाई का तो जमाना ही नही रहा..।” मयुर हिन्दित पुटपुटला.
पुढचा आठवडा बराच
जोशात गेला.. सगळिकडे धामधुमीचं वातावरण होतं.. सगळ्यांच्या तोंडि फक्त एकच विषय
होता.. “जोश २०११”.. बडे बडे बॅनर लागले गेले.. लिफ़्ट्स मध्ये, प्रत्येक floor वर रंगीबेरंगी पोस्टर्स लावुन ग्लोबल-लॉगिक गर्दी खेचु पाहत
होतं. एक वेगळाच उत्साह भरुन वाहत होता, प्रत्येक जण
आपल्यातलं छुपं टॅलेन्ट जगासमोर आणण्यासाठी ओडिशनसाठी नाव-नोंदणी करु लागला होता.
आणि ६व्या मजल्यावर नेहेमीप्रमाणे शांतता होती. तिच्या डेस्कवर मात्र तिचं
मेडिटेशन चालु होतं
“सहजच सुचलं
म्हणुन...” अर्रे वा.. नाव तर चांगलयं, सह्याद्रीवर भरभरून प्रेम करणाऱ्या एका निसर्ग भक्ता चा तो ब्लॉग
होता, त्याच सह्याद्रीवरचं प्रेम ओळी ओळीनं
मधून दिसत होत. या ब्लॉग ची पारायण तिची नित्याची असायची. “डाव्या हातात Alt+Tab key हाताशी ठेवुन तिने ब्लोग उघडला.
आणि सर्वात
जुन्या पोस्ट वाचायला सुरुवात केली. २-४ पोस्ट तिने एका दमात वाचुन काढल्या,
“आजच तुझी पोस्ट
वाचली मस्त वाटत वाचुन...एक एक वाक्य –
ओळ न ऒळ सुन्दर आहे..
प्रत्येक वाक्य वेगळं.. कुठ्ल्याहि पोस्ट मध्ये तोच-तो पणा नाहि.. सगळं कस
नविन, वेगळं अणि
अव्वल.. अणि तुझ्या प्रत्येक शब्दांची , विषेशणांची विशेष दखल घेतली जातिये.. प्रत्येक पोस्ट मनात
कोरली जाते... समोर दिसते जशी घडताना..
किति सुंदर असेल सगळं जे तु अनुभवलंस ...!! सुर्योदय, सुर्यास्त, उन, पाउस, वारा.. सगळं
सगळं अनुभवनं होत तुझ्याबरोबर.. अणि तो गड सर केल्याचा आनंद वाचणा-य़ाला इथेहि
होतो.. कित्तीतरी भाव असतात वाचताना आश्च्रर्य.. उत्सुक्ता.. आनंद.. हास्य... खुप
छान वाटत वाचायला.”
.. तिने ब्लोग वर
कमेंट केली.. आणि पुन्हा कामात व्यग्र झाली.
पुढ्चे २-३ महिने
असेच.. कामात गेले.. नित्यनियमाप्रमाणे कामा बरोबरच कामा व्यतिरिक्तची कामेहि पार
पडत होती. हळुहळु ब्लोग वाचणंहि कमी होवु लागलं होतं.. तिने पुर्णपणे कामामध्येच
लक्ष केंद्रित केलं. प्रोजेक्ट थोड्याच दिवसात आता लाईव्ह होणार होतं. डेड्लाइन्स
आखल्या गेल्या.. प्रोजेक्ट डिलिवरि डेट जशी-जशी जवळ येत होती तश्या सगळ्यांच्या
झोपा उडाल्या, कामाचं प्रेशर जाणवु लागलं होतं.. आणि तो दिवस आलाच, मॅनेजर ने सगळ्यांना बोलवुन घेतलं, प्रत्येक टिमचं तोंडभरुन कौतुक केलं, आभार-प्रदर्शन केलं गेलं.. अणि प्रोजेक्ट लाइव्ह गेलेला आहे
असं सांगितलं.. प्रत्येकाने निदान पुढचे शनिवार-रविवार खिशात पडल्याने सुटकेचा
नि:श्वास सोड्ला.
[क्रमश:]
[क्रमश:]
खूप सुंदर लिहिला आहेस पण हे तू लिहिलंय यावर विश्वास नाही बसत. असाच लिहित जा भरपूर म्हणजे आम्ही वाचत जाऊ………
ReplyDeleteThanks Nilakshi.. :)
Deletewa mast :) .. pudhacha part lavkar post kar
ReplyDeleteExcellent story...! Waiting for next part. Keep it up...! :-)
ReplyDeleteSimply Great! Nice story with excellent Presentation!! Lavakr purna kar na... Lavkar post kar pudhcha part
ReplyDeleteThank you all... :)
ReplyDeleteExcellent..khupach chaan..characters ani scenes dolya pudhe ubhe rahile �� Excited to read the next part..lavkar post kar..
ReplyDeleteThanks Savlyaa.... :)
ReplyDeleteखुपच मस्त!!!
ReplyDelete