(गोष्ट तुझी नी माझी....-भाग-१ पासुन पुढे..)
आशाच एका निवांत क्षणी तिच्या मेलबोक्स मध्ये एक मेल खणाणला.. ग्लोबल-लॉगिक ने आय.टी कंपन्यां अंतर्गत होण्यार्या स्पर्धांमध्ये बाजी मारली होती, आणि सहभाग घेतलेल्या सगळ्यांचे आभार आणि पारितोषिक मिळवणार्यांचे अभिनंदन त्या मेलमध्ये करण्यात आलं होतं, गायन-वादन, न्रुत्य, अभिनय जवळ-जवळ सगळ्याच क्षेत्रात ग्लोबल-लॉगिक ने आपला झेंडा फ़डकवला होता. ती फोटोज बघत होती.. लोकांच्या कलेचं कौतुक ती मनातच करत होती.. एक-एक करत सगळे फोटो बघणं चालु होतं. अचानक एका फोटोपाशी येउन तिचे हात थबकले.. बहुतेक एका नाटकाचा फोटो असावा..निळा टि-शर्ट घातलेला एक मुलगा आणि त्याच्या समोर असणारी मुलगी एकमेकांच्या अगदि डोळ्यात-डोळे घालुन पहात होते.. दोघेहि मस्त हसत होते..
“Woowww.. हा कोण असेल.. हा होता जोशमध्ये? पुण्याचा असेल का?? आ्णि ही कोण आहे..? त्याची गर्ल्फ़्रेण्ड असेल का? नसेल तरी अत्तापर्यंत झाली असेल कदाचित.. किति intensity आहे ह्याच्या डोळ्यात.. डोळे किति छान आहेत... smile किती गोड आहे.. अर्रे..काय होतयं हे आपल्याला.. कदाचित आपल्या कंपनीत असेल.... किंवा नसेल ही..... हे एवढं असं बघण्यची काय गरज आहे..नाटकच आहे ना..!!”” तिचा उगाचच जळफ़ळाट झाला.
Outlook मध्ये एक private फ़ोल्डर बनवुन ते मेल तिने सेव केलं, पुढचे २-३ आठवडे त्याच्या फोटोने तिची पाठ काही सोडली नाहि.. लंचच टाईमिंग बदलुन ही तिला तो कुठेच दिसला नाही.. हळु हळु ती विसरुन गेली.. कधी-कधी तो तिला एकदम आठवे.. पण तसं बैचेन करणं त्याने सोडलं होतं.. आणि नवल म्हणजे ह्याबाबतीत तिने तिच्या सखीला म्हणजेच निशीला काहिच सांगितल नव्हतं..
आशातच एक-दिड महिना उलटला.. मॅनेजर ने क्वार्टरलि टिम मीटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं. “आपला प्रोजेक्ट आता मेंनटेनन्स फेज मध्ये जाणार आहे..” ची घोषणा केली, तिथे बसलेला प्रत्येकजण काय समजायचं ते समजुन गेला.
“काय गं कळ्ळ का काही...” निशी म्हणाली
“येस्स.. म्हणजे आतातरी काम बदलेल.. प्रोजेक्ट मेंनटेनन्स फेजमध्ये जातोय आणि एवढ्या मोठ्या टिमची गरज नाहिये आता त्यांना... आता काहितरी नविन शिकायला मिळेल... नविन प्रोजेक्ट.. नविन काम.... आणि..... ” तिच्या आवाजात उत्साह जाणवत होता.
“........आणि नविन टिमपण” निशी मध्येच पचकली.
“हो ना यार.. आपल्याला एकच प्रोजेक्ट मिळेल अस पण नहिये ना.....काय यार..!” ...ती
दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि एकदम म्हणाल्या “कसल्या सेंन्टि होतोय आपण.. हे..हे..हे..!!” त्यानंतर दोघी बराच वेळ हसत-गप्पा मारत होत्या..
अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत होत्या, त्यानंतर अठवड्या भरातचं टिममध्ये बहुतेकांच्या हातात रीलीज-लेटर पडायला लागले होते. पण तिचा नंबर काही येत नव्ह्ता.. तिची एकुलती एक मैत्रिण पण तिला सोडुन आता दुसर्या प्रोजेक्ट मध्ये शिफ़्ट झाली होती..सरणार्या प्रत्येक दिवसागणिक तिच्या मनातली चल-बिचल वाढत होती.. जे काही थोड फ़ार कंटाळवाणं काम असायचं आता ते देखिल नव्ह्तं..
“असचं होत.. जे नाहिये आपल्याकडे.. त्याच्याच मागे मन धावतं” तिने ब्लोग उघडुन तसाच परत बंद केला.. अणि resume अपडेट करायला सुरुवात केली, प्रोजेक्ट च नाव.. क्लायंट.. टिम साईज.. प्रोजेक्ट ची सविस्तर माहिती.. वगैरे महिती तिने पटापट भरुन घेतली..
“Role & Responsibilities handled…… काय लिहाव बरं इथे..??काहि शिकलोय का आपण इथे.. ?? कसले role.. आणि कसल्या Responsibilities..!!
..जाउदेत........!”
बराच वेळ डोक खाजवुन तिला काहिच सुचत नव्ह्तं
याच विचारात असताना तिला सेम-टाईम या कंपनी-अंतर्गत कामासाठी असलेल्या मेसेंजर वर तिच्या मॅनेजर चा पिंग आला.. आणि तिला वन-टू-वन साठी बोलवण्यात आलं. अगदी क्षणाचाहि वेळ न दवडता तिने आपली पावलं मॅनेजरच्या केबिनकडे वळवली..
“May I come in sir?.....” तिच्या चेहेर्यावर कसलातरी आनंद दिसत होता
“Ohh.. yes.. yes.. Please come
in…!!..... please sit… how are you doing?” .. मॅनेजर
“I’m doing good sir..” [बोल.. बोल.. लवकर बोल.. मुद्य्यावर ये अर्रे..... ]
“कसयं ना आता, आपलं प्रोजेक्ट आता लाईव्ह गेलयं, तुही बघतच असशील कि जास्त काम उरली नाहियेत, तु खरचं खुप मेहेनत घेतलीस...कमी वेळात बर्याच गोष्टी शिकुन घेतल्या...चांगल काम केलयसं..! ”
“हो ते टिम-वर्कच होत..सर.. ” [कित्ति अर्रे हा संथपणा... नक्किच मनमोहनला follow करत असणार]
“आता खरचं पुढचे ३-४ महिने काहिच काम नाहिये, आणि माझ्या हातात असलं असतं ना तर मी इतका चांगला टेस्टर हातचा जाउ दिला नसता..पण तुला माहितिच आहे कि RMG ला रिपोर्ट द्यावे लागतात... आपल्या कंपनित चांगल्या रिसोर्सेसना असच बसवुन ठेवलं जात नाहि..!! ”
“हो सर.. ते कळतयं मला..” [उगाच नाय तुझ नाव गोड्बोले... कित्ति ही साखर-पेरणी..]
“म्हणुनच मला आता तुला रिलिज कराव लागतयं, पण तु याकडे पण एक चांगली opportunity म्हणुन पहा, जसं इथे काम केलसं तसच दुसर्या प्रोजेक्टमध्ये पण कर, तुला बरचं नविन शिकायला हि मिळेल”
“हो ते ही आहेच..” [भगवान के घर देर है..मगर अंधेर नहि...]
रिसोर्से-पुलमध्ये म्हणजेच बेंचवर आल्यापासुन तिच आणि ब्लोगच तुटलेलं कनेक्शन पुन्हा जुळुन आलं होतं, कोणीच टोकणारं नसल्याने आता बिनधास्त ती ब्लोग चाळत बसायची, पण जास्तवेळ तिला तिच्या आवडिच्या ब्लोगचा आस्वाद घ्यायला मिळाला नाही कारण आता इंटरव्य्हु सुरु झाले होते. देउन आलेल्या इंटरव्य्हुचं विश्लेषन ती मयुर बरोबर करत असे आणि मयुर त्यावर स्वत:च्या expert comments देई.
“अग्ग्गं तुला समजलयं का?... तुझे तिन्हि इंटरव्य्हु KMKच्याच ३ वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधुन झालेत..” मयुर ने कहितरी भयानक शोध अणि shock लागल्यासारखं झटक्यात बोलुन दाखवलं
“हो माहितिये मला.. मग त्यात काय दचकण्यासारखं आहे..” तिने मंदपणे उलट प्रश्न केला..
“अग्गं हे तिन्ही प्रोजेक्ट्स KMKच्याच अंडर येतात.... " त्याच्या चेहेर्यावरचे shock लगल्यासारखे expressions अजुनही कायम होते..
“so what.. फ़िरुन फ़िरुन तेच काय सांगतोस... स्पष्ट बोल ना...!! तिची “ओळख पाहु काय” खेळ खेळायची क्षमता संपत आता आली होती..
“म्हणजे तुला नक्किच KMK हा प्रोजेक्ट मिळणार..!!” मयुरने आपलं विशेष ज्ञान पणाला लावुन भविष्यवाणी केली
“हो मग मिळाल तर मिळाला..... त्याच काय एवढं???” ती
“अग्गं आपला ओंकार आहे ना.. तो देखिल ह्याच प्रोजेक्ट्मध्ये आहे.. इथे लोक कंटाळतात खुप.. आणि या प्रोजेक्ट मध्ये फ़क्त येण्यार्यांची पावलं दिसतात.. जाण्यार्यांची नाहि.. म्हणजे तुला कधी रिलीज हवा असेल तर मागुन मिळणार नाहि.. तुला कंपनीच बदलावी लागेल.” मयुर
“ओय.. तु घाबरवु नकोस रे.. असं काहिहि नाहि होणार... मी कशाला रिलीज मागेन..उगाचच काहिहि असतं तुझं..!!”
तिने अस म्हण्ट्लं खरं.. पण त्याच ते बोलणं तिच्या मनातुन जात नव्हतं.. आत तिला उगाचच भिती वाटत होती. ”आपण का कुणावर विश्वास ठेवायचा.. आपण कुठे experience केलयं अजुन.. कदचित तस नसेलहि.. चांगला प्रोजेक्ट असणार.. कंपनीतला ३र्या क्रमांकाचा सगळ्यात मोठ्ठा प्रोजेक्ट आहे तो.. मग नसेल असं.. ” तिने स्व:ताचिच समजुत काढली..”पण हा सांगतोय त्यात तथ्य असेल तर...??????? ” तिच स्व:ताशीच दुमत होउ लागलं होत “जाउदे..मनात एवढ्या शंका असल्यावर कुठे लक्ष लागणार आपलं तिथे.. नकोच तो प्रोजेक्ट... देवा...... ऐकतोस का रे.. नको रे टाकुस त्या प्रोजेक्टमध्ये मला” एव्हाना देवालाहि दुसरा प्रोजेक्ट मिळावा यासाठी साकडं घालणं सुरु झालं होतं
पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या कुठे घडतात? मध्येच कुठेतरि नियती नावाचा फ़ॅक्टर असतोच ना..!! दुसर्याच दिवशी RMG कडुन मेल आला. **Congratulation.. you have been allocated to KMK project**..
“हाय राम.. कर्म माझं.. मयुर म्हणाला त्यातलं पाव तरी खरं झालं.. मला हाच प्रोजेक्ट मिळाला..श्या...” त्याच दिवशी तिचा डेस्कही चेंज झाला.. अगदी ६व्या मजल्यावरुन- २र्या मजल्यावर तिच सामान हलविण्यात आलं.. पण जाताना आपण अगदिच नाईलाजाने जातोय हे तिने मयुरला जाणवु दिलं नाहि.
[क्रमश:]
good one..:)
ReplyDeleteUnbelievable!!! but vry well try :):) Keep blogging :)
ReplyDeleteThanks :)
DeleteNice flow... Laukar laukar yeude pudhche parts
ReplyDeleteNice flow... Keep it up. Next part laukar post kar
ReplyDeleteThanks Bhakti :)
DeleteThanks :)
ReplyDeleteNice One shweta.... :)
ReplyDeletevery nice... waiting for next part..
ReplyDeletecontinue writing... waiting for your next post
ReplyDeletemasst lihilayes... kahi goshti aaplya lives shi match hotat.. felt very close to heart.. <3
ReplyDeletemasst lihilayes... kahi goshti aaplya lives shi match hotat.. felt very close to heart.. <3
ReplyDeletethanks Aboli.. :)
DeleteWaaa ..Khup Chhan lihilayas .. :)
ReplyDeletemast!
ReplyDeleteMast..!!! Watal navt ek IT madhli mulgai yevdh lihu shaken :)
ReplyDeleteThank You Sir .. :)
DeleteNice. Very nicely written. Did't knew that you write so good.
ReplyDeleteShweta chaan lihla ahes :),teesra bhag yeu de ki ata
ReplyDeleteShweta khupach. Sunder lihilayas keep it up
ReplyDelete